मोर : मराठी माहिती ( निबंध)

मोर : मराठी माहिती ( निबंध ) मोर : मराठी माहिती ( Peacock) आपल्या भारतात अनेक पक्षी सुंदर, रंगीबेरंगी आहेत .प्रत्येक पक्षी आपापल्या वैशिष्ट्यानुसार रंग रूपानुसार वेगवेगळे आहेत . गरुड ,घार, पोपट, कबूतर, सारस ,बदक, कावळा, खंड्या पक्षी यांची रंग रूपे वेगळे आहेत. अनेक पक्षांमध्येही स्पष्टपणे उठून दिसणारा पक्षी म्हणजे मोर हेच सर्वांचे उत्तर येईल .गरुड हा पक्षांचा राजा असला तरी मोर सुंदरतेमुळे, आकर्षकतेमुळे भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मानला जातो. मोर (peacock)हा सौंदर्याच्या बाबतीत अद्वितीय असाच आहे. त्याला पाहताना पाहतच राहावे असे वाटते .मोराची मान लांबीने मोठी असते. मोराची मान गडद निळ्या रंगाची असते .उंच मानेमुळे त्याला सभोवार लक्ष ठेवण्यास मदत होते. सरडे ,कीटक, साप ,किडे, मुंग्या यासारखे भक्ष्य पकडण्यास त्याला जलद गतीने मदत होते. उंच मानेमुळे त्याला त्याच्या शत्रूवर नजर ठेवण्यास मदत होते .मोर उंचीने ,आकाराने मोठा असल्यामुळे रुबाबदार दिसतो. त्याच्या उंच मानेमुळे, उंच पायामुळे मोठ्या पंखामुळे व लांब अशा पिसाऱ्यामुळे मोर हा अति...