मोर : मराठी माहिती ( निबंध)

मोर : मराठी माहिती ( निबंध ) 


 मोर : मराठी माहिती ( Peacock) 

          आपल्या भारतात अनेक पक्षी सुंदर, रंगीबेरंगी आहेत .प्रत्येक पक्षी आपापल्या वैशिष्ट्यानुसार रंग रूपानुसार वेगवेगळे आहेत . गरुड ,घार, पोपट, कबूतर, सारस ,बदक, कावळा, खंड्या पक्षी यांची रंग रूपे वेगळे आहेत. अनेक पक्षांमध्येही स्पष्टपणे उठून दिसणारा पक्षी म्हणजे मोर हेच सर्वांचे उत्तर येईल .गरुड हा पक्षांचा राजा असला तरी मोर सुंदरतेमुळे, आकर्षकतेमुळे भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मानला जातो. मोर (peacock)हा सौंदर्याच्या बाबतीत अद्वितीय असाच आहे. त्याला पाहताना पाहतच राहावे असे वाटते .मोराची मान लांबीने मोठी असते. मोराची मान गडद निळ्या रंगाची असते .उंच मानेमुळे त्याला सभोवार लक्ष ठेवण्यास मदत होते. सरडे ,कीटक, साप ,किडे, मुंग्या यासारखे भक्ष्य पकडण्यास त्याला जलद गतीने मदत होते. उंच मानेमुळे त्याला त्याच्या शत्रूवर नजर ठेवण्यास मदत होते .मोर उंचीने ,आकाराने मोठा असल्यामुळे रुबाबदार दिसतो. त्याच्या उंच मानेमुळे, उंच पायामुळे मोठ्या पंखामुळे व लांब अशा पिसाऱ्यामुळे  मोर हा अतिशय सुंदर दिसतो. डोक्यावरील तुरा त्याच्या सौंदर्यात आणखी भर टाकतो. हा तुरा सुद्धा मोराचे वेगळेपण आहे .मोराचे मुख्य वेगळेपण म्हणजे त्याची पिसे व त्यापासून फुलवणारा पिसारा होय. शेपटीकडे असणारी अनेक पिसे खालून वर घेत 360 अंशामध्ये ही पिसे पसरवून मोर आपला पिसारा उभा करतो किंवा तयार करतो .तेव्हा हा पिसारा पाहण्यासारखा असतो. ठिकठिकाणी पिसाच्या शेवटी असणारा डोळा उठून दिसतो .हेच डोळे असणारे पीस मोराचे मुख्य सौंदर्य आहे. मोराच्या शेपटी जवळच्या भागात छोटे छोटे पिसाचे डोळे असतात. शेपटीच्या शेवटच्या भागात मोठा डोळा असतो .अशा वेगळ्या रचनेमुळे पिसारा फुलवल्यानंतर सर्वच ठिकाणी आपल्याला डोळेच डोळे पहावयास मिळतात. आणि अशी डोळा असलेले  मोरपंख किंवा पिसे आपण आपल्या दप्तरातील पुस्तकांमध्ये ,वह्यांमध्ये ठेवत असतो .काही वेळा ही पिसे आपल्या अंगावरून ,हातावरून ,चेहऱ्यावरून फिरवून एक वेगळाच स्पर्श अनुभव घेत असतो. मोराच्या पिसांचा उपयोग घर सजावटीसाठी केला जातो. आयुर्वेदामध्ये मोराच्या पिसांचा उपयोग औषधांसाठी केलेला आढळतो. 

मोराचा अधिवास कोठे असतो : 

‌ मोर व लांडोर यांचा मिलनाचा कार्यकाल पावसाळ्यात जून , जुलै या महिन्यात येतो . मे महिन्याच्या अखेरीनंतर व जून महिन्याच्या सुरुवातीपासून जेव्हा पावसाची सुरुवात होते किंवा आकाशात ढग जमायला चालू होतात तेव्हा मोर लांडोरी ला आकर्षित करण्यासाठी मोर व लांडोर यांचा मिलनाचा कार्यकाल पावसाळ्यात जून- जुलै या महिन्यात येतो . मे महिन्याच्या अखेरीनंतर व जून महिन्याच्या सुरुवातीपासून जेव्हा पावसाची सुरुवात होते किंवा आकाशात ढग जमायला चालू होतात तेव्हा मोर  लांडोरीला आकर्षित करण्यासाठी  पिसारा फुलवून एक सारखा नृत्य करत राहतो, मोराचे असे नाचणे साधारणपणे दहा मिनिटापर्यंत चालत असते.या नृत्याचे वेळी मोर काही वेळा गरागरा फिरतो .पिसारा खालीवर हलवतो. पीसे डावीकडे ,उजवीकडे, खालीवर हलवतो. या साऱ्या हालचालीमुळे एक वेगळाच आवाज येत असतो . थुई थुई नाचणारा मोर या पायावरून त्या पायावर त्या पायावरून या पायावर असा नाचत असतो .अशा नाचण्या वेळीची पिसांची रचना किंवा आकृती तयार होते ती विलोभनीय असते .मोराचा पिसारा , समोरून , पाठीमागूनही पाहण्यासारखा असतो .लग्नात, वरातीत किंवा मोठ्या कार्यक्रमात मोरासारखे नाचणे आता सार्वत्रिक झाले आहे .(मोर डान्स) मोर नृत्य म्हणून प्रसिद्ध झाले आहे .अनेक आदिवासी मोर नृत्य करतात .मोर नाचून मादिंना आपल्याकडे जास्तीत जास्त मिलनासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. या नृत्यावर किंवा नाचण्यावर लांडोरी आकर्षित होतात .यातून त्यांचे मिलन होते. यावेळी लांडोरी आपली अंडी खड्ड्यात किंवा गवत असलेल्या ठिकाणी घालते .एकावेळी लांडोरी पाचसहा अंडी घालू शकते. मोर लांडोरी चे पिल्लू मोठे होण्यास दोन-तीन वर्षाचा कालावधी जातो .मोर हा कुक्कुटवर्गीय व कुटुंब वत्सलपक्षी असल्यामुळे गटागटाने राहतो .एका गटामध्ये साधारणता पाच- दहा -पंधरा -वीस -पंचवीस वर असे मोर लांडोरी व पिल्ली असतात. मनुष्य प्राणी दिसताच मोर त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.

‌ मोरांचा अधिवास मुख्यतः नदीकाठी ,डोंगरभागात किंवा हिरव्यागार प्रदेशात असतो .ज्या ठिकाणी झाडे- झुडपे आहेत अशा ठिकाणी मोरांचे वारंवार वास्तव्य आपल्याला दिसून येते. दिवसभर अन्नासाठी फिरणारा मोर संध्याकाळी झाडांच्या फांदीवर झोपतो. 

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? 

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे .तर गरुड हा पक्षांचा राजा मानला जातो. १९६३ मध्ये मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून दर्जा देण्यात आला. मोराला सांस्कृतिक वारसा आहे .त्यामुळे मोराचे महत्व आणखीनच वाढले. मोराच्या सुंदरतेमुळे व वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यामुळे त्याला हे विशेषत्व देण्यात आले आहे. पुराणकाळापासून मोराचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. भगवान कार्तिकेयांचे मुख्य वाहन म्हणजे मोर होय. तसेच देवी सरस्वती ने ही मोराला आपल्या जवळचे स्थान दिले आहे. सरस्वती देवीचे वाहन सुद्धा मोर आहे. हिंदू धर्मामध्ये जसे नंदी , उंदीर यांना महत्त्व दिले आहे .तसेच मोर या पक्षाला सुद्धा देवत्व प्राप्त झाले आहे . पुरातन काळी मोरांच्या पिसांपासून लेखन केले जायचे .मोरांच्या पिसांचा वास्तुशास्त्रात अनेक ठिकाणी उपयोग सांगितला गेला आहे. त्यामुळे मोर व त्याची पिसे बहुमूल्य आहेत . मोर हा शांततेचे व प्रेमाचे प्रत्येक मानला गेला आहे. त्यामुळे मोराची पिसे घराघरात लावली जातात. त्यामुळे पती- पत्नी यांच्यातील संबंध चांगले राहतात असे मानले जाते. या पिसांचा काही वेळा औषधसाठी उपयोग केला जातो. मोर शेतकऱ्यांचा मित्र मानला गेला आहे. मोर शेतातील किडे, मुंग्या, वाळवी ,सरपटणारे प्राणी खाऊन टाकतात त्यामुळे शेतकऱ्याला शेतात पीक घेताना मदत होते. 

        मोराचे अन्न

  मोर अन्न म्हणून किडे, मुंग्या ,वाळवी, सरपटणारे प्राणी, साप ,पाली ,भुंगे ,आळ्या खातो .तसेच शेतात पडलेले अन्नधान्य खाऊन मोर आपले पोट भरतात. त्यासाठी त्यांना दिवसभर अन्नाच्या शोधात भटकावे लागते. 

मोराचा आवाज किंवा ओरडणे:

मोर ओरडताना म्याऊ- म्याऊ असा आवाज जोरजोरात काढतो .असे जोरात ओरडल्याने त्याचा आवाज लांब पर्यंत शिवारात जातो .मोराच्या ओरडण्याला केकारव म्हणतात . म्याऊ - म्याऊ ओरडणे बच्चे कंपनीला फार आवडते.

 मोर मादीला काय म्हणतात? 

   मोर मादीला लांडोर (लांडोरी) म्हणतात.( peahen) . 

 मोर का नाचतात 

मे महिन्या च्या अखेरीस व जून महिना हा काळ मोर व मादी लांडोरीच्या मिलनाचा हंगाम असतो. या विणीच्या काळात आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर किंवा पाऊस पडत असताना मोर आनंदाने नाचू लागतो. कारण मोर आपल्या प्रेयसीला आपल्याकडे आकृष्ठ, आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो .मोर सुंदर असे नृत्य करून लांडोरीला आपल्याबरोबर सहवासासाठी इशारा देत असतो . खुणवत  असतो.

  मोराची हत्या करणे किंवा शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे :

मोराला पुरातन काळापासून महत्व असल्यामुळे तसेच त्याच्या सुंदरतेमुळे व विविध गुणवैशिष्ट्यांमुळे मोराला १९६३ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. सहाजिकच यामुळे मोर या पक्षाला अभय मिळाले. मोर साधारणपणे २५ वर्षापर्यंत जगतो. भारतीय वन अधिनियम १९७२ नुसार मोरांची शिकार करणे कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. कायद्यानुसार मोरांना पिंजऱ्यात ठेवणे ,घरी सांभाळणे किंवा त्यांची हत्या करणे याविषयी कायदा कडक झाल्यामुळे मोरांची संख्या वाढली आहे .काही वर्षांपूर्वीपासून शिकारी मोराचे मटण खाण्यासाठी व मोरांच्या पिसासाठी मोठ्या प्रमाणात हत्या करत होते .ते आता थांबले आहे. याचा परिणाम म्हणून आज बऱ्याच ठिकाणी मोरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. मोर हा उंचीने २ फुटापर्यंत असतो. त्याची चोच टोकदार असते. मान उंच व लांब असते .मोराचे पाय सुद्धा उंचीला मोठे जाडीला बारिक असतात .पण ते काटक असतात. मानेमुळे मागे पुढे पाहून शत्रूवर नजर ठेवण्यास मदत होते . सापासारखे पक्ष पकडण्यात मदत होते .तर लांबलचक पायामुळे जलद गतीने पाळण्यास मदत होते. मोराचे पंजे धारदार व तीक्ष्ण असतात. शेपटी पाशी असणाऱ्या पिसापासून पिसारा फुलवण्यास मदत होते. मोर हा पक्षी आकाराने मोठा असल्याने फार उंच उडू शकत नाही .मोराला शेपटीकडे पीसे असतात ,तर लांडोरीला पिसे नसतात . मोर साधारणता ५ फुटापर्यंत आकाराने लांब असतो. मोराच्या पिसाऱ्यामध्ये १५०  पर्यंत पिसांची संख्या किंवा त्याहून जास्त असू शकते. मोराचे पंख राखाडी गडद निळ्या रंगाचे असते .विनिचा काळ संपल्यानंतर मोराची सर्व पिसे झडतात किंवा गळून पडतात .झाडाझुडपात, जाळ्यामधून फिरत असतानाही त्यामध्ये पीसे अडकून राहतात .अलीकडील काळात वातावरणातील बदलामुळे मोरांच्या रंगांमध्ये बदल झालेला दिसून येतो .काही ठिकाणी क्वचितपणे पांढरा मोर सुद्धा आढळून आलेले ऐकण्यात किंवा पाहण्यास मिळते .श्रीलंका , म्यानमार  ( ब्रह्मदेश) या देशांचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. मराठीत मोरा संबंधी अनेक गीते प्रसिद्ध आहेत. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच हे बालगीत खूपच प्रसिद्ध आहे. मोर  हा प्रेमाचे व शांततेचे, समृद्धीचे प्रतीक मानले जाते .रांगोळी व चित्रकला कृतीमध्ये मोर प्रसिद्ध आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मोराचे पंख तिजोरीत ठेवल्यामुळ, धनाची वाढ होते असे म्हटले जाते. तसेच ज्या ठिकाणी मोर असतात अशा ठिकाणी सापांचे वास्तव्य कमी प्रमाणात आढळते. 

अलीकडील काळात जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा पक्षी सुद्धा मानवी वस्तीकडे वळत आहे.यामुळे मोरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. तेव्हा या राष्ट्रीय पक्षाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. 

मोराचे नृत्य यावरील माझा व्हिडिओ युट्युब वर आहे तो नक्की पहा

https://youtu.be/BS_HTdwmP20

















Comments

Popular posts from this blog

नंदीबैल