नंदीबैल


नंदीबैल व नंदीबैलवाला काय करतात ? 

नंदीबैल व नंदीबैलवाला हे आज एका गावात उद्या दुसऱ्या गावात असे फिरत फिरत आपला जीवन चरितार्थ चालवतात.जाता जाता प्रत्येक गावात नंदीबैल वाले लोकांचे भविष्य सांगतात. तसेच नंदीबैल मान  हलवून होय किंवा नाही असे उत्तर देतो.

नंदीबैल व नंदीबैलवाला यांचा पेहराव

नंदीबैलाला झुला घालून सजवलेले असते .शिंगाला बेगडी घातलेली असते.गळ्यात घुंगरू चाळ  व घंटा यांचा पट्टा अडकलेला असतो.शिंगे खूप छान पद्धतीने रंगवलेले असतात.तर नंदीबैलवाला यांच्या अंगावर काळे कोट किंवा जॅकेट असते.डोक्याला भला मोठा फेटा परिधान करतात.हातातछोटी काठी असते.खांद्यावर झोळी अडकवलेले असते.तसेच कपाळावर हळद  लावलेली असते. हातात मोठे कंडे किंवा कडे घातलेले असते. 


 #नंदी बैल#

आला आला नंदीबैलवाला आला

खेडेगावात नंदीबैलवाला, अस्वल वाला ,माकडवाला कडकलक्ष्मी, पोतराज असे लोक आले की सर्व लोक जमा होतात.नंदीबैलवाले लोकांना भविष्य सांगून खुश करतात.दिवसभर या गावातून त्या गावात फिरत जे काही मिळेल त्यावर समाधान मानून आपली गुजरान करतात. बैलासाठी धान्य मागून घेतात. त्याला चारा पाण्याची गावा गावात जाताजाता सोय करतात. तसेच आपल्या पोटापाण्यासाठी भाकरी तुकडा किंवा चटणी भाकर घेऊन खातात. लोकही त्यांना आवडेने व प्रेमाने धान्य, जेवण, चारापाणी देतात. लोक त्यांनी सांगितल्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. नंदीबैलवाले आल्यानंतर बच्चे कंपनीत एक वेगळाच आनंद पहावयास मिळतो. मोठ्या शिंगाचा व मोठा आकाराचा बैल पाहून ते आनंदून जातात. महिला मंडळी बैलाला ओवाळून पूजन करतात व त्याला आपल्या मनातील नवस पूर्ण व्हावे यासाठी बोलतात. नंदीबैलवाले ,हेळवी, पोतराज, कडकलक्ष्मी हे सर्व शिवाजी महाराजांच्या  पूर्व कालापासून चालत आले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. असे लोक म्हणजे शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते असे ते सांगत होते .ही कला जपली गेली जावी. त्यांना लोकांनी साथ द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

नंदीबैल व नंदीबैलवाल्या विषयी माहिती

नंदी बैल ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील व परंपरेतील संकल्पना किंवा परंपरा चालत आली आहे.नंदी म्हणजे बैल होय.बैलालाच नंदी म्हटले जाते .नंदीला हिंदू धर्मात खूप मानाचे स्थान आहे.हिंदू धर्मात जसे मनुष्य जातीला देवत्व दिले आहे.तसेच अनेक पशु ,पक्षी, प्राणी यांना सुद्धा देवत्व दिले आहे किंवा देव मानले आहे .उदा.नंदी हा देव.नागराज हा देव.गरुड हा देव आहे .नंदी हा भगवान महादेवाचे वाहन आहे.आणखी एक महत्त्वाचे उंदीर हा श्री गणेशाचे वाहन आहे.उंदराची सुद्धा हिंदू धर्मात पूजा केली जाते. उंदराला सुद्धा मानाचे स्थान दिले गेले आहे.त्यामुळे हिंदू धर्मात ,संस्कृतीत अशा पशुपक्षी प्राण्यांना मानाचे स्थान आहे .नंदीबैल व त्याच्याबरोबर येणाऱ्या लोकांना  नंदीबैलवाला असे म्हणतात.नंदीबैलवाले नंदीबैलाला अंगावर ,मांडीवर उभा करतात. पोटावर उभे करतात. ही मंडळी  नंदी बैलाला सजवून दारोदारी नेतात. त्यावेळेस नंदीबैल वाले जसे जसे बोलतात त्याप्रमाणे नंदीबैल आपली मान होय किंवा नाही म्हणून हलवतो. असे मान हलवणे ग्रामीण भागातील लोकांना ,लहान मुलांना, बाया बापड्यांना आवडते. नंदीवाले गावागावात गेल्यावर लोकांना भविष्य सांगून आपला उदरनिर्वाह, चरितार्थ चालवितात .त्याच्याविषयी लोकगीत ही प्रसिद्ध आहे. मंगेश पाडगावकर यांनी नंदीबैलाच्या  वर्तवणूकिवर  सांग सांग भोलानाथ हे बालगीत सुद्धा लिहिले आहे .हे गीत आजही नंदीबैल आल्यावर सर्वांच्या ओठावर आपसूकच येते. नंदीबैलाच्या अंगावर किंवा शिंगावर ओम असे काही वेळा लिहिले जाते. त्रिशूल काढले जाते. नंदीबैलासाठी म्हणून लागणारा बैल हा राजस्थान ,काठेवाड, गुजरात, सुरती, सोमनाथ येथून आणला जातो. नंदीबैलाची ही कॉन्ट्रीट नावाची जात आहे .या जातीचा बैल असा आकाराने भला मोठा असतो. काही वेळानंदी ढोल , वाजवणाऱ्याच्या आवाजावर गर्दीतील माणसे नावानुसार ओळखतो. ही मानस ओळखण्याची नंदीबैलाची कमाल लोकांना भावून जाते .आमच्या गावात येणारे नंदीबैलवाले हे पंढरपूर बारामती गावाकडून आल्याचे सांगतात. असा हा नंदीबैल सर्वांनाच आवडतो.


Comments